चिडचिडे जनार्दन आजोबा आनंदी झाले त्याची गोष्ट !!
जनार्दन आजोबा ! वय वर्ष ७२ .. पण उत्साह अगदी तरुणांना लाजवेल असा ! राजकिय चर्चा, सामाजिक विषयांवर खलबते, रोजच्या बातम्या पाहाणे, उत्तम वाचन, समवयस्कांशी चेष्टा-मस्करी ह्यात निवृत्तीचे छान जीवन जगत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो उत्साह बराच कमी झाला होता. तसा आजार कोणताही नाही, ना कौटुंबिक टेन्शन ! पण गेले काही दिवस ते थोेडेसे चिडचिडे झाले होते. काही बोलायचे म्हणले तर त्रासिकपणे उत्तर द्यायचे.
एकदा शेजारचे विसूभाउ खास जनार्दन आजोबांना भेटायला आले.
थोड्याफार गप्पा झाल्यावर मग आजोबा म्हणाले, "विसू...अरे आजकाल पचनशक्ती फारच कमजोर झालीय बघ... काहीही खाल्लं तरी पोटच साफ होत नाही. दिवसभर असे फुगल्यासारखे राहाते... त्यामुळे चैन पडत नाही बघ.. कोणाला सांगायचे तर ते लगेच चूर्ण देतात .. परवा कोणतेतरी चूर्ण घेतले तर एकदमच जुलाब झाल्यासारखे झाले आणि जीव घाबरल्यासारखा झाला रे ... काय करावं ते समजतच नाही बघ !"
विसूभाउंना मग आजोबांच्या बदलत्या स्वभावाचे कारणच कळाले आणि ते हसतच म्हणाले,"अरे साधी तर गोष्ट आहे..मला आधी का नाही सांगायचे ... तुला माहितिये ना माझी सून आयुर्वेदिक डॉक्टर आहे , तिने मला एक साधा उपाय सांगितला आहे ... तू पण करून बघ "
"अरे सांग पटकन" जनार्दन आजोबा उत्साहात म्हणाले...
"ऐक" विसुभाऊ उपाय सांगू लागले ," एका पातेल्यात ग्लासभर पाणी घ्यायचे आणि त्यात २ छोट्या आल्याच्या फोडी व अगदि एक-दोन लवंगा टाकून ते पाणी थोडे गरम करायचे ... फार उकळायचे नाही...मग जेवण झाल्यावर साधे पान खायचे आणि त्यावर हे पाणी प्यायचे ... आणि हो पान म्हणजे अगदी कात-चूना-सुपारी वगैरे घालून नाही बरंका ... फक्त हिरवे पान खायचे, काहीही न घालता .. व त्यावर पाणी प्यायचे ...रोजचा थोडासा चालण्याचा व्यायाम करायचा ... अगदी १०-१५ मिनीटे चालणे...बस्स...४ दिवसात तुझा हा आजार कमी होतोय बघ !"
जनार्दन आजोबांनी अगदी मनावर घेतले. सुनबाईंकडून रोजच्या रोज पाणि तापवून आले-लवंगा घालून घ्यायचे ... आणि अगदी चारच दिवसांत त्यांचे पोट उत्तम साफही होवू लागले व पुर्वीचा उत्साह परत आला...

Comments
Post a Comment