छोट्या पुर्वाची गोष्ट !
पूर्वा, छोटीशी दहा वर्षांची असेल, खूप हसरी, चिमुकली - गोंडस ! रोज शिस्तीने , कोणतीही तक्रार न करता अगदी हसरी खेळती. तिची सकाळ ६ वाजता सुरु व्हायची , पट्पट् आवरुन ७ वाजता स्कूल बस मध्ये बसणारी. पुर्वाची आई मेघा पण अगदी शिस्तीने सगळे आवरुन द्यायची.
पुर्वा शाळेला गेल्यावर मग मेघाची व पुर्वाच्या बाबांची ऑफिसची तयारी सुरु व्हायची. दोघांनाही ८:३० वाजता ऑफिसला निघावे लागायचे.
त्यामुळे रोज डब्यात काय द्यायचे हा मेघासमोरिल यक्षप्रश्न असायचा ! त्यामुळे डब्यात काय तर गडबडीमुळे पास्ता, नुडल्स, केक, सॅंडविच इ. जंक फुड !! सकाळी पुर्वा दुधही पित नसे. पुर्वाला दुध, दही, तुप इ. गोष्टी अजिबात आवडत नसत. मेघाला पण वेळ नसल्याने "जे काही पुर्वा पोटभर खाते, तेच खूप" असे वाटत असे.
पण सोसायटी गार्डन मध्ये पुर्वा खेळत होती. पळता-पळता पाय कोठेतरी अडकून पडली. मग काय हाताला खूप सुज आली, हात खूप दुखायला लागला आणि ती रडतरडतच घरी आली. मेघाने तिला डॉक्टरकडे नेले. चेकअप केले तर काय "हाताला फ्रॅक्चर !".
बागेत सहज पडल्यावरही हाताचे हाड फ्रॅक्चर !!
डॉक्टरांनी प्लास्टर केले, आणि प्लास्टर करता करता गप्पाही मारल्या. त्यांना पुर्वाची दिनचर्या समजली आणि फ्रॅक्चरचे खरे कारणही कळाले.
कॅल्शियम डिफिशियन्सी - कॅल्शियमची कमतरता !!
मग डॉक्टरांनी काही औषधे व डाएट चार्ट दिला. ज्यात शेवगा, पेरु, वांगी, भोपळं इ. भाज्या खाण्यास सांगितले. तसेच कॅल्शियम सप्लिमेंट करिता टॅबलेट कॅल्सिफेरोल गोळी दिली.
आणि ३ आठवड्यांमध्ये पुर्वा बरी झाली.
आता पुर्वा रोज एक ग्लास दुध पिते. बिया असलेल्या फळे-भाज्या खाते. आणि खेळताना पडली तर लगेच उठून पुन्हा पळायला लागते..

Comments
Post a Comment