श्वेतप्रदर (व्हाईट डिसचार्ज)
रसिका ! २५ वर्षांची असेल. लग्नाकरिता घरचे स्थळे पहात होती. देखणी, सुदृढ बांध्याची. २८ वर्षांच्या सुरजने तिला पसंती दिली. सुरज अगदी वेल सेटल्ड व्यावसायिक होता. त्याचे कपड्यांचे दुकान मस्त चालायचे. साखरपुडा झाला. लग्नाची तारिख ६-७ महिन्यानंतरची निघाली. सगऴी धावपळ सुरु होती. प्रत्येक दिवस काही ना काही खरेदित जायचा. आणि खरेदिला गेले कि काही ना काहीतरी खास खाणे व्हायचेच..कधी पाणीपुरी कधी मिसळपाव तर कधी मसाला पुरी. दिवस आनंदात जात होते. आणि एक दिवस अचानक रसिकाला ताप आला, थंडी वाजून डोकेही दुखू लागले. तोंडाला चव नव्हती आणि थोडी मळमळही होवू लागली. शेजारिच डॉक्टरकाकू राहात होत्या..रसिका त्यांच्याकडे गेली, त्यांनी तपासणी केली..काही प्रश्नही विचारले.. त्यांच्या काही लक्षातही आले. त्यांनी विचारले ," तुला काही व्हाईट डिसचार्ज होतोय का?" रसिका म्हणाली, " हो..गेले १५ दिवस होतोय...अगदी पांढरे पाणी अंगावरुन जातंय " डॉक्टरकाकू म्हणाल्या, " त्यामुळेच तू निस्तेज, थकलेली दिसत आहेस...डोळ्याखाली ही काळी वर्तूळे दिसत आहेत". रसिका म्हणाली, "पण हे कसे झाले? मी तर नीट काळजी घे...